Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
Saturday, 20 September 2025
fundamental analysis
फंडामेंटल अॅनालिसिस – स्टेप बाय स्टेप गाईड
शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फंडामेंटल अॅनालिसिस ही पद्धत सर्वात महत्वाची आहे. यात कंपनीची खरी ताकद, नफा, कर्ज, व्यवसाय मॉडेल आणि भविष्यातील संधींचा अभ्यास केला जातो. चला पाहूया पायरी-पायरीने:
1️⃣ कंपनीची प्राथमिक माहिती जाणून घ्या
कंपनी कोणत्या क्षेत्रात (सेक्टर) काम करते?
तिची उत्पादने/सेवा कोणती आहेत?
मार्केटमध्ये तिचा स्पर्धात्मक फायदा आहे का?
उदा. एशियन पेंट्स = रंग उद्योगात मार्केट लीडर.
2️⃣ आर्थिक अहवाल (Financial Statements) वाचा
Balance Sheet: मालमत्ता, कर्ज, भांडवल
Profit & Loss Statement: विक्री, खर्च, नफा
Cash Flow Statement: रोकड येणे-जाणे
👉 हे अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर किंवा NSE/BSE वर मिळतात
3️⃣ महत्वाचे फाइनान्शियल रेशो तपासा
P/E Ratio (Price to Earnings): शेअरची किंमत नफ्याच्या तुलनेत महाग आहे का?
ROE (Return on Equity): भागधारकांवर किती परतावा मिळतो?
Debt to Equity Ratio: कंपनीवर कर्ज जास्त आहे का?
Profit Margin: विक्रीतून किती टक्के नफा मिळतो?
4️⃣ उद्योग व स्पर्धा (Industry & Competition)
त्या क्षेत्रात वाढीची शक्यता किती आहे?
स्पर्धक कंपन्यांपेक्षा ही कंपनी कशी कामगिरी करते?
उदा. HDFC Bank – बँकिंग सेक्टरमध्ये सातत्याने वाढ.
5️⃣ व्यवस्थापनाची गुणवत्ता तपासा
संचालक व CEO किती अनुभवी आहेत?
कॉर्पोरेट गव्हर्नन्स (पारदर्शकता) आहे का?
कंपनीच्या निर्णयांमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोन आहे का?
6️⃣ भविष्यातील संधी (Future Growth)
नवीन प्रोजेक्ट्स/उत्पादने येणार आहेत का?
ग्लोबल मार्केटमध्ये विस्ताराची शक्यता आहे का?
तंत्रज्ञानात गुंतवणूक आहे का?
7️⃣ Intrinsic Value (खरी किंमत) ठरवा
कंपनीचा भविष्यातील नफा अंदाजे काढा.
तो नफा आजच्या किमतीत मोजा (Discounted Cash Flow).
जर शेअरची बाजार किंमत Intrinsic Value पेक्षा कमी असेल → खरेदी योग्य.
8️⃣ दीर्घकालीन गुंतवणूक करा
चांगली कंपनी योग्य किंमतीत मिळाली तर दीर्घकाळ होल्ड करा.
वारंवार ट्रेडिंग टाळा.
Warren Buffett style – Quality stocks, Long-term holding
निष्कर्ष
फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे कंपनीच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा अभ्यास. योग्य पद्धतीने केल्यास गुंतवणूकदाराला स्थिर आणि मोठा परतावा मिळतो
india Vix
📊 India VIX म्हणजे काय?
शेअर बाजारामध्ये VIX (Volatility Index) ला "भय निर्देशांक" (Fear Index) म्हणूनही ओळखले जाते. भारतातील शेअर बाजारासाठी हा निर्देशांक India VIX म्हणून मोजला जातो.
🔹 India VIX म्हणजे काय?
India VIX हा असा निर्देशांक आहे जो पुढील ३० दिवसांत बाजारात किती चढ-उतार (volatility) होऊ शकतो हे दाखवतो.
- जास्त VIX = जास्त भीती/चढउतार
- कमी VIX = कमी भीती/स्थैर्य
हा निर्देशांक मुख्यत्वे NIFTY Options च्या प्रीमियमवर आधारित असतो.
🔹 India VIX कसा काम करतो?
- जर VIX वाढला तर याचा अर्थ गुंतवणूकदारांना पुढे बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्याची अपेक्षा आहे.
- जर VIX कमी झाला तर याचा अर्थ बाजार तुलनेने स्थिर आहे आणि गुंतवणूकदारांना मोठा धोका वाटत नाही.
🔹 गुंतवणूकदारांसाठी महत्व
- Risk Management: VIX पाहून गुंतवणूकदार आपली जोखीम (Risk) नियंत्रित करू शकतात.
- Trading Decisions: जास्त VIX असताना Options ट्रेडिंगमध्ये प्रीमियम महाग होतो.
- Market Sentiment: VIX हा थेट बाजारातील गुंतवणूकदारांचा भावनिक कल (Sentiment) दाखवतो.
🔹 साधे उदाहरण
👉 जर India VIX 12-15 दरम्यान असेल, तर बाजार तुलनेने स्थिर मानला जातो.
👉 जर VIX 20 पेक्षा जास्त गेला, तर मोठा चढ-उतार येण्याची शक्यता असते.
✍️ निष्कर्ष
India VIX हा फक्त एक आकडा नाही तर तो गुंतवणूकदारांच्या मनस्थितीचा आरसा आहे. जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करत असाल, तर India VIX वर लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे
Thursday, 18 September 2025
Wednesday, 6 August 2025
Thursday, 31 July 2025
लोकमान्य टिळक मराठी निबंध भाषण 2023 Lokmanya Tilak Marathi Essay Speech 2023
अध्यक्ष महाशय आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी लोकमान्य टिळक यांच्या विषयी काही महत्त्वाचे दोन शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती.
आपला भारत देश गुलामगिरीत असल्यामुळे अनेक थोर महान नेत्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले ..फुले, आंबेडकर, शाहू महाराज, गांधी ,नेहरू ,आगरकर, सावरकर ,भगतसिंह ,राजगुरू, सुखदेव आदि अनेक महापुरुषांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यापैकीच लोकमान्य हे एक होते.. आज आपण लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याविषयी माझे माझे दोन शब्द सांगणार आहे.
लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै १८५६ रोजी चिखली या गावी झाला हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे.त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य यांचे नाव केशव होते. हे नाव त्यांना त्यांची कुलदेवता केशव नावाची होती ;म्हणून त्यांचेही नाव केशव ठेवले होते.
लाल बाल पाल असे आपण ऐकले असेल.. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल.. या तिघांनी मिळून स्वातंत्र्यलढ्यासाठी खूप प्रयत्न केले म्हणून लाल बाल पाल तिघांची जोडी सगळ्यांच्या परिचयाची आहे.. त्यांनी इंग्रज सरकार हे या देशातून निघून जावे यासाठी अतोनात प्रयत्न केले; म्हणून यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला.
लोकमान्य यांचे बालपण अतिशय खडतर होते त्यांचे वडील चिखलगावचे खोत होते. त्यांना तीन बहिणी होत्या आणि त्यांचे खरे नाव केशव होते ,तरीही बाळ या नावानेच त्यांना बोलले जात होते ..त्यांचे वडील संस्कृत मध्ये पंडित होते., शिवाय शिक्षक म्हणून काम करत होते.. त्यांच्या वडिलांना गणिताविषयी भरपूर आवड होती. त्यानंतर त्यांची बदली पुण्यात झाली. पुण्यात आल्यानंतर त्यांना अनेक शिक्षक मिळाले त्यांच्या आचार विचारातून त्यांना भरपूर शिकायला मिळाले. अन्यायाविरुद्ध चिड निर्माण होत होती, अशातच त्यांच्या लहान वयातच त्यांची आई वारली आणि लोकमान्य हे सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे ही निधन झाले.. त्यानंतर त्यांचे काका गोविंदपंत यांनी लोकमान्य यांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला.
करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते त्यांनी सरकारी नोकरी न करता आपले आयुष्य देशसेवेसाठी घालवणे उचित आहे हे ठरवलं होते म्हणून देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे त्यांचे विचार होते; परंतु त्यांच्या विचारांमध्ये एवढी तफावत होती की आगरकर हे सामाजिक सुधारणा यासाठी आग्रही होते तर टिळक हे राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी आग्रही होते.
टिळकांना अगोदर भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी त्यांचे विचार होते तर आगरकर यांचे असे विचार होते की अगोदर समाज हा सुधारला पाहिजे. स्वातंत्र्य हे उशिरा मिळाले तरी चालेल यामुळे दोघांचे मैत्रीचे संबंध असले तरीही दोघांच्या मतमतांतरामुळे विचारात वैचारिक मतभेद निर्माण झाले; पण त्यांची मैत्री त्यांची देशनिष्ठा हे मात्र एकमेकांना पूरक अशीच होती.
लोकमान्य भारतीय असंतोषाचे जनक म्हणून नावारूपास आले होते ..लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली होती.. लोकमान्य याचा अर्थ लोकांनी स्वीकारलेले, लोकांना मान्य असलेले लोकमान्य हे त्यावेळी लोकांच्या मनामध्ये प्रभाव टाकत होते; म्हणून लोकांना ते हवेसे वाटत असल्यामुळे लोकांनी दिलेली ही त्यांना उपमा होती.. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणाच असा त्यांचा परखडपणे विचार होता.
लोकमान्य टिळक यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत झाले.. लोकमान्य टिळक यांना सहा अपत्य होती त्यापैकी एक लहानपणीच वारला होता, त्यापैकी तीन मुली आणि दोन मुले राहिले त्यांच्या पत्नीचे नाव तापीबाई होते हे नाव त्यांचे लग्नाच्या अगोदरचे होते.. लग्नानंतर त्यांचे नाव सत्यभामाबाई असे ठेवले.. ज्यावेळी लोकमान्य हे ब्रह्मदेशात तुरुंगात असताना तापीबाई यांचे निधन 7 जून 1912 रोजी झाले .ह्या कोकणातील त्यांना त्यांचे गाव लाडघर होते..त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते.
अशा पद्धतीने आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी माझे चार शब्द ऐकून घेतले त्याबद्दल या ठिकाणी गुरुजनवर्ग आणि विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा लोकमान्य टिळक यांना शतशः अभिवादन करतो आणि माझे भाषण थांबवतो..जय हिंद जय महाराष्ट्र !
Tuesday, 29 July 2025
ऑनलाईन सेवा
1 महाराष्ट्र राज्याचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in
2 राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) cbsenet.nic.in
3 राज्य पात्रता परीक्षा (SET) setexam.unipune.ac.in
4 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) www.upsc.gov.in
5 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) www.mpsc.gov.in
6 म.लो.से.आयोगाचे फॉर्म संकेतस्थळ mahampsc.mahaonline.gov.in
7 महाराष्ट्रातील सरळसेवा भरती संकेतस्थळ maharecruitment.mahaonline.gov.in
8 नवीन रोजगार जाहिराती nmk.co.in
9 राष्ट्रीय आणि राज्य रोजगार माहिती freejobalert.com
10 स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती empsckatta.blogspot.com
11 महाराष्ट्र शासनातील भरती माहिती mahanews.gov.in
12 लोकराज्य वाचण्यासाठी dgipr.maharashtra.gov.in
13 योजना (मराठीत) yojna.gov.in
14 SIAC, मुंबई siac.gov.in
15 शासन सेवा वयोमर्यादा जी.आर. GR PDF
16 शासन सेवा प्रवेशाचा शासन निर्णय [GR PDF](https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20040413171548 001.pdf)
17 स्टाफ सिलेक्शन कमिशन ssc.nic.in
18 रोजगार व स्वयंरोजगार विभाग maharojgar.gov.in
19 माहिती व जनसंपर्क संचालनालय dgipr.maharashtra.gov.in
20 भारत सरकारचे अधिकृत संकेतस्थळ india.gov.in
21 महाराष्ट्रातील जिल्हे districts.nic.in
22 महाराष्ट्राचे अधिनियम bhasha.maharashtra.gov.in/MarathiAdhiniyam.aspx
23 केंद्र शासनाचे अधिनियम (मराठी) bhasha.maharashtra.gov.in/KendraAdhiniyam.aspx
24 भारताचे संविधान (मराठीत) Savidhan PDF
25 शासन निर्णय (शासन संकेतस्थळ) maharashtra.gov.in/1145/शासन-निर्णय
26 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ sgbau.ac.in
27 सर्व शिक्षा अभियान ssa.nic.in
28 माध्यमिक शिक्षण व्यवस्थापन प्रणाली semisonline.net
29 केंद्रीय मानव विकास मंत्रालय mhrd.gov.in
30 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे mscepune.in
31 मध्यान्ह आहार योजना trgmdm.nic.in
32 म.रा.मा.व उच्च मा. शिक्षण मंडळ mahahsscboard.maharashtra.gov.in
33 म.रा.शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद mscert.org.in
34 राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान परिषद ncert.nic.in
35 प्राथमिक शिक्षण ww1.depmah.com
36 उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र dhepune.gov.in
37 संच मान्यता, महाराष्ट्र शासन edustaff.maharashtra.gov.in
38 INCOME TAX DEPARTMENT incometaxindia.gov.in
39 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ycmou
40 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ignou.ac.in
41 ई - बालभारती ebalbharati.in
42 SCHOOL REPORT CARD schoolreportcards.in
43 U-DISE dise.in
44 UPSC upsc.gov.in
45 MPSC mpsc.gov.in
46 महाराष्ट्रचे अधिनियम कायदे MarathiAdhiniyam
47 केंद्र शासन अधिनियम (मराठी) KendraAdhiniyam
48 भारताचे संविधान (मराठी PDF) Savidhan
49 भारत सरकार अधिकृत संकेतस्थळ india.gov.in
50 आपले सरकार संकेतस्थळ aaplesarkar.maharashtra.gov.in
51 शासकीय कार्यालय व पत्ते mahacontact.com
52 पंतप्रधान कार्यालय (मराठी) pmindia.gov.in/mr
53 पंतप्रधानांना कल्पना कळवा mygov.in
54 पंतप्रधानांना लिहा pgportal.gov.in
खाली दिलेली सर्व शैक्षणिक संस्थांची व योजना संबंधित संकेतस्थळे लिंकसह टेबल स्वरूपात दिली आहेत:
क्रमांक नाव / योजना संकेतस्थळ लिंक
1 सर्व शिक्षा अभियान ssa.nic.in
2 माध्यमिक शिक्षण व्यवस्थापन व माहिती प्रणाली semisonline.net
3 केंद्रीय मानव विकास मंत्रालय mhrd.gov.in
4 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे mscepune.in
5 मध्यान्ह आहार योजना trgmdm.nic.in
6 म.रा.मा.व उच्च मा. शिक्षण मंडळ, पुणे mahahsscboard.maharashtra.gov.in
7 म.रा. शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद mscert.org.in
8 राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद ncert.nic.in
9 प्राथमिक शिक्षण depmah.com
10 उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र dhepune.gov.in
11 संच मान्यता, महाराष्ट्र शासन edustaff.maharashtra.gov.in
12 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ignou.ac.in
13 ई - बालभारती, महाराष्ट्र ebalbharati.in
14 SCHOOL REPORT CARD schoolreportcards.in
15 U-DISE dise.in
16 शिक्षण खाते, महाराष्ट्र शासन education.maharashtra.gov.in
17 ई-शिष्यवृत्ती mahaeschol.maharashtra.gov.in
ईतर उपयुक्त वेबसाईट
आजचा दिनविशेष पहा : http://mahitisagar.com/
मराठी बोध कथा वाचा : http://marathibodhkatha.blogspot.in/http://marathibodhkatha.blogspot.in/
हिंदी बोध कथा वाचा : http://bodhkathamala.blogspot.in/http://bodhkathamala.blogspot.in/
इंग्रजी मध्ये बोध कथा वाचा : http://www.really-learn-english.com/english-short-stories.html
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा ईतिहास वाचा : http://www.wikiwand.com/mr
मुख्यध्यापकांसाठी उपयुक्त माहिती
अ) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
1)जनरल रजिस्टर
2)विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
3)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
4)शाळा सोडल्याचा दाखला आवक फाईल,
5)शाळा सोडल्याचा दाखला जावक रजिस्टर,
6)वार्षिक निकाल पत्रक रजिष्टर
7)जन्म प्रमाणपत्र फाईल,
8)सतत गैरहजर रजिस्टर,
9)शैक्षणिक सर्वे रजिस्टर,
10)आरोग्य तपासणी रजिष्टर
11)पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
12)निकाल रजिस्टर,
13)मूल्यमापन नोंदवही,
14)बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
15)अपंग विद्यार्थी रजिस्टर
16)पालक संपर्क रजिस्टर,
17)आरोग्य तपासणी रजिस्टर,
18)आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
19)परीक्षा पेपर फाईल
आ) शिक्षकांसंबंधी अभिलेखे
1)शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर
2)शिक्षक हजेरी रजिस्टर
3)भ. नि. निधी रजिस्टर,
4)शिक्षक रजेचे रजिस्टर, व रजा अर्ज फाईल,
4)शिक्षक सुचना रजिस्टर,
5)शिक्षक हालचल रजिस्टर,
6)पाठ टाचण वही,
7)वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
8)शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर
9)पगारपेड रजिस्टर,
10)पगारपत्रक फाईल,
11)मुख्याध्यापकांचे लॉगबुक
इ) आर्थिक अभिलेखे
1)सादील कँशबुक
2)सादील खर्च पावती फाईल,
3)सादील लेजरबुक,
4)स.शि.अभियान कँशबुक
5)स.शि.अभियान खर्चाची पावती फाईल,
6)स.शि.अभियान.लेजरबुक,,
7)शाळा सुधार फंड कँशबुक
8)शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
9)उपयोगीता प्रमाणपत्र फाईल
ई) कार्यालयीन इतर अभिलेखे
1)३० सप्टेंबर EMIS / U -DISE माहिती फाईल
2)३१ मार्च सांख्कीय माहिती
3)फाईल पदभार देवघेव रजिस्टर
4)शालेय प्रतवारी
5)वार्षिक कार्य योजना ( AWP &B )
6)शाळा विकास आराखडा
परिपत्रके, आदेश फाईल
उ) शासकीय योजना अभिलेखे
1)सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर
2)शालेय पोषण आहार दैनदीन नोंद रजिस्टर,
3)शालेय पोषण आहार चव रजिस्टर
4)शालेय पोषण आहार धान्य साठा रजिस्टर
5)शालेय पोषण आहार पावती फाईल
6)मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
7)मोफत गणवेश वाटप रजिस्टर
8)लेखन साहित्य वाटप रजिस्टर,
9)उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
10)उपस्थिती भत्ता देयके फाईल,
11)शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
ऊ) मालमत्ता नोंद
1)डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२
2)स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर
अभिलेखे जतन कालावधी
अ.क्र. अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावजतन करावयाचा कालावधी
(01) अ सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर -कायम
(02) अ फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही -कायम
(03) अ परिपत्रके, आदेश फाईल कायम
(04) अ भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही कायम
(05) अ मुख्याध्यापकाचे लॉगबुक कायम
(06) ब रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) 30 वर्षे
(07) ब कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती 30 वर्षे
(08) ब विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल 30 वर्षे
(09) ब नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र 30 वर्षे
(10) ब रोकड वही / खतावणी (स.शि.अ.)30 वर्षे
(11) ब विद्यार्थी संचयी नोंदपत्रक 30 वर्षे
(12) ब सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे
(13) क-1 इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे 10 वर्षे
(14) क-1 शाळा सोडल्याचे दाखले 10 वर्षे
(15) क-1 फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही 10 वर्षे
(16) क-1 आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके 10 वर्षे
(17) क-1 विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके 10 वर्षे
(18) क-1 वसतिगृह खोलीभाडे नोंदवही10 वर्षे
(19) क-1 महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार 10 वर्षे
(20) क-1 फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती 10 वर्षे
(21) क-1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) 10 वर्षे
(22) क-2 जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही 5 वर्षे
(23) क-2 आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब 5 वर्षे
(24) क-2 रोकडवही (शा. पो. आ.) 5 वर्षे
(25) क-2 शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही 5 वर्षे
(26) ड सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) 18 महिने
(27) ड शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज 18 महिने
विद्यार्थी लाभाच्या योजना
==========================================
१) उपस्थिती भत्ता
इ.१ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
==========================================
२)मोफत गणवेश योजना
इ.१ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
==========================================
३)मोफत लेखन साहित्य
इ.१ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
==========================================
४)शालेय पोषण आहार
इ. १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
==========================================
५)राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
इ. ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
==========================================
६)मोफत पाठ्यपुस्तके
इ . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
==========================================
७)मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
==========================================
८)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
==========================================
९)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली
==========================================
10)माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
इ. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली
==========================================
११)परीक्षा फी ई. १० वी
(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
==========================================
११)अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती इ. १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही
२)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र
३)खालील व्यवसाय असावेत .
जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
==========================================
१२)अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
इ. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी
अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
==========================================
13)राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
==========================================
13)राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
==========================================
१४)अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
==========================================
१५)मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
==========================================
१६)PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
इ. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
१)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
२) उत्पन्न १ लाखांपर्यंत
३)साक्षांकीत फोटो
४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
==========================================
१७)सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
इ. १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .
==================================
Monday, 5 May 2025
Subscribe to:
Comments (Atom)